MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 03 October 2022 -TV9
या वर्षी पहिल्यांदाच दोन ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा होत असल्याने आपण असमाधानी असल्याचे रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवेमारण्याची खोटी माहिती देणाऱ्या अविनाश वाघमारे यांची चौकशी करत पोलिसांनी सोडून दिले. तर याप्रकरणी वाघमारे याला घाटकोपरच्या पंतनगर पोलीसांनी चौकशीनंतर सोडून दिले. तर वाघमारे याला काल पुणे पोलिसांनी लोनावळा येथून ताब्यात घेतले होते. तर अविनाश हा मेंटली डिस्टर्ब असल्याची प्रतिक्रीया त्याच्या पत्नीनं दिली आहे. तर त्यानं हे फक्त पैशासाठी असं केलं असावं. त्यासाठी आम्ही माफी मागतो असेही अविनाशच्या पत्नीनं म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुरक्षा वाढवण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आदेश दिले आहेत. तर या वर्षी पहिल्यांदाच दोन ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा होत असल्याने आपण असमाधानी असल्याचे रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतापराव जाधव यांचे नाव न घेता टीका केली आहे. तसेच हल्ली जो उठतोय तो स्क्रिप्ट घेऊन आरोप करतोय असे पेडणेकर म्हणाल्या.
Published on: Oct 03, 2022 08:51 AM
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
