AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 Reporter Exit Poll Results 2024 : राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? ‘tv9 रिपोर्टर पोल’चा अंदाज काय?

TV9 Reporter Exit Poll Results 2024 : राज्यात ‘मविआ’ची सत्ता? कोणाला किती जागा? ‘tv9 रिपोर्टर पोल’चा अंदाज काय?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Nov 20, 2024 | 8:57 PM
Share

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. विविध संस्थांचे वेगवेगळी आकडेवारी समोर आली आहे. या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.

आज झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता महाराष्ट्रातील विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. विविध संस्थांचे वेगवेगळी आकडेवारी समोर आली आहे. या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. नुकतंच टीव्ही 9 रिपोर्टर पोलच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. टीव्ही 9 रिपोर्टर पोलनुसार महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. टीव्ही 9 रिपोर्टर पोलनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी कदाचित बहुमताचा आकडा गाठण्यात यशस्वी होऊ शकतात. टीव्ही 9 रिपोर्टर पोलच्या अंदाजानुसार, महायुतीला 129-139 जागा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपला 81 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाला 25 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 23 पेक्षा जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. यासह महाविकास आघाडीला 136 ते 145 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, काँग्रेसला 50 पेक्षा जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाला 44 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 42 पेक्षा जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

Published on: Nov 20, 2024 08:45 PM
Follow Us