CM Eknath Shinde : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार, एकनाथ शिंदे यांची माहिती; राज्याचं काम थांबू दिलं नसल्याचाही दावा
'राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. पण मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर आपण पाहताय की शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे निर्णय घेतली. पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला, दुष्काळग्रस्त भागात पाणी वळवण्याचा निर्णय घेतला'.
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. पण मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर आपण पाहताय की शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे निर्णय घेतली. पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला, दुष्काळग्रस्त भागात पाणी वळवण्याचा निर्णय घेतला. कालच्या कॅबिनेटमध्ये आम्ही अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अनेक प्रकल्प जे राज्याच्या हिताचे आहेत ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार आहे. सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. राज्याचं काम आम्ही थांबू दिलं नाही, असा दावाही शिंदेंनी केलाय.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

