HSC Result 2021 | बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कसा आणि कुठे पाहाल ?

इयत्ता बारावीचा निकाल उद्या दुपारी चार वाजता लागणार असून तो ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल. त्यासाठी एकूण चार वेबसाईट्स जारी करण्यात आल्या आहेत.

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता (Maharashtra HSC Result 2021) वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे.

इयत्ता बारावीचा निकाल उद्या दुपारी चार वाजता लागणार असून तो ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल. त्यासाठी एकूण चार वेबसाईट्स जारी करण्यात आल्या आहेत. या वेसबाईट्स खालीलप्रमाणे आहेत.

1.  https://hscresult.11thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI