AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक

Mumbai | महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक

| Updated on: Jun 02, 2026 | 6:16 PM
Share

राज्यात वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे आंदोलन छेडले आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत.

मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकाजवळ शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन सुरू केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे जीवन अधिक कठीण झाल्याचे शिवसेना नेत्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मुंबईतील कांदिवली परिसरात काँग्रेसकडूनही इंधन आणि घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

महागाई, इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढत असताना, विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात महागाईच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 02, 2026 06:16 PM

Follow Us