AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Result 2026 | विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, दहावीचा निकाल कुठे पाहता येणार?

SSC Result 2026 | विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, दहावीचा निकाल कुठे पाहता येणार?

| Updated on: May 08, 2026 | 9:58 AM
Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता राज्य मंडळाकडून अधिकृतरीत्या निकाल प्रसिद्ध करण्यात येणार असून, लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. यंदा राज्यभरातून तब्बल 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता राज्य मंडळाकडून अधिकृतरीत्या निकाल प्रसिद्ध करण्यात येणार असून, लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. यंदा राज्यभरातून तब्बल 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. निकाल जाहीर होण्याची वेळ जवळ येत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी निकालाची टक्केवारी किती लागणार, तसेच मुलांपेक्षा मुली बाजी मारणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास किंवा एखाद्या विषयाचा निकाल समाधानकारक नसल्यास विद्यार्थ्यांसाठी पुनर्मूल्यांकन आणि पडताळणीसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना पुढील अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे : www.tv9marathi.com आणि https://mahahsscboard.in ह्यावर सुद्धा तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.

 

Published on: May 08, 2026 09:58 AM
Follow Us