AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान

Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा’, लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान

| Updated on: Aug 23, 2026 | 5:18 PM
Share

प्रक्षोभक भाषा वापरल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंनी भाजप आमदार महेश लांडगेंना थेट आव्हान दिले आहे, पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा. सांगलीतील मोर्चात लांडगेंनी केलेल्या भाषणावरून सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या असून, अशा आमदारांना अटक करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.

भाजप आमदार महेश लांडगे यांनी सांगलीतील एका मोर्चात प्रक्षोभक भाषा वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे. “पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा,” असे सुप्रिया सुळेंनी लांडगेंना सुनावले. सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर या दांपत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चात महेश लांडगे यांनी भाषण केले होते.

या भाषणात त्यांनी हातात सापडला तर तोडून टाका असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याच प्रक्षोभक भाषणावर सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की, अशा प्रकारची प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या आमदारांना तातडीने अटक करण्यात यावी. नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, महेश लांडगे आणि अक्षय कर्डिले यांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदार सातत्याने प्रक्षोभक वक्तव्ये करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्राची शांतता बिघडवणाऱ्या या प्रवृत्तींना आवरावे, असे आवाहन त्यांनी केले.

Published on: Aug 23, 2026 05:18 PM

Follow Us