tv9 Marathi Special Report | पुणे हादरलं! बाथरूममध्ये टाइम बॉम्ब ठेवणारा सीसीटीव्हीत कैद, इलेक्ट्रिक बाइक अन् डोक्यावर कॅप…
पुण्यातील एका खासगी रुग्णालयात मोठा अनर्थ टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या बाथरूममध्ये ठेवलेला संशयास्पद टाइमबॉम्ब वेळीच आढळून आल्याने संभाव्य स्फोट टळला. सफाई कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली असून, मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सफाई कर्मचाऱ्याला बाथरूममध्ये संशयास्पद वस्तू दिसल्यानंतर त्याने तात्काळ डॉक्टरांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
पुण्यातील एका खासगी रुग्णालयात मोठा अनर्थ टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या बाथरूममध्ये ठेवलेला संशयास्पद टाइमबॉम्ब वेळीच आढळून आल्याने संभाव्य स्फोट टळला. सफाई कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली असून, मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सफाई कर्मचाऱ्याला बाथरूममध्ये संशयास्पद वस्तू दिसल्यानंतर त्याने तात्काळ डॉक्टरांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पथकाने हा बॉम्ब सुरक्षितरीत्या रुग्णालयाबाहेरील मोकळ्या मैदानात नेऊन नियंत्रित स्फोट घडवून निष्क्रिय केला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता मोठी होती आणि जर रुग्णालयातच स्फोट झाला असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
दरम्यान, बॉम्ब ठेवणारा संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संबंधित व्यक्ती इलेक्ट्रिक बाईकवरून आल्याचे समोर आले असून, त्याने डोक्यावर कॅप घातली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला “घातपाताचा प्रयत्न” असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी संशयिताची ओळख पटवल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास ATS, IB आणि पुणे पोलिसांकडून संयुक्तपणे सुरू असून, या कटामागे नेमके कोण आहे याचा शोध घेतला जात आहे. संशयित आरोपी ताब्यात आल्यानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: May 15, 2026 11:10 AM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच

