AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?

Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?

| Updated on: Jun 09, 2026 | 10:06 AM
Share

केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या कोट्यवधी कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. सरकारने एलपीजी सिलेंडरवरील सबसिडी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता वर्षभरात केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान (सबसिडी) देण्यात येणार आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना 9 सिलेंडरवर सबसिडीचा लाभ मिळत होता.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या कोट्यवधी कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. सरकारने एलपीजी सिलेंडरवरील सबसिडी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता वर्षभरात केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान (सबसिडी) देण्यात येणार आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना 9 सिलेंडरवर सबसिडीचा लाभ मिळत होता.

या निर्णयानंतर देशभरातून नाराजी व्यक्त केली जात असताना, सरकारने याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. अनेकांनी हा निर्णय मध्य-पूर्वेतील तणाव आणि वाढत्या इंधन खर्चाशी जोडला होता. मात्र, सरकारने हा निर्णय योजनेंतर्गत अनुदान वितरणाचे पुनर्मूल्यांकन आणि व्यवस्थापन लक्षात घेऊन घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हा होता. सुरुवातीला लाभार्थ्यांना वर्षभरात 14.2 किलो वजनाच्या 12 एलपीजी सिलेंडरवर सबसिडी मिळत होती. त्यानंतर ही मर्यादा 9 सिलेंडरपर्यंत कमी करण्यात आली होती.

आता नव्या निर्णयानुसार, उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना वर्षभरात फक्त 4 सिलेंडरवरच सबसिडीचा लाभ मिळणार आहे. या निर्णयाचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विरोधकांकडूनही यावर टीका केली जात आहे.

दरम्यान, सरकारकडून या निर्णयामागील कारणांबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून, पुढील काळात या धोरणात काही बदल होणार का, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 09, 2026 10:06 AM

Follow Us
Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?.

Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं.

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासह या तीन मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन; तिसरी मागणी काय?.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासह या तीन मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन; तिसरी मागणी काय?

CJP Protest: सोनम वांगचूक, कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ राज्यभरात विद्यार्थी उतरले रस्त्यावर.

CJP Protest: सोनम वांगचूक, कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ राज्यभरात विद्यार्थी उतरले रस्त्यावर

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग...

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग..