TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट… बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पक्षातील नाराज असलेल्या 58 आमदारांच्या गटाने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी मिळाल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पक्षातील नाराज असलेल्या 58 आमदारांच्या गटाने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी मिळाल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा धक्का मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा मानला जात आहे.
दरम्यान आता आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. आमदारांनंतर तृणमूल काँग्रेसमधील खासदारांचा गटही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद आणखी तीव्र झाल्याचे बोलले जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी या सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसच्या काही खासदारांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर संबंधित खासदारांचा गट केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी हे देखील उपस्थित होते. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Jun 08, 2026 03:26 PM
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी

