AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?

ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?

| Updated on: Jun 10, 2026 | 6:31 PM
Share

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी बंडाळी झाल्याची चर्चा सुरू आहे. पक्षातील 19 लोकसभा खासदारांनी वेगळा गट तयार केल्याची माहिती समोर आली आहे. या बंडखोर गटात माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण, अभिनेता आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा तसेच सायोनी घोष यांची नावे चर्चेत आहेत.

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी बंडाळी झाल्याची चर्चा सुरू आहे. पक्षातील 19 लोकसभा खासदारांनी वेगळा गट तयार केल्याची माहिती समोर आली आहे. या बंडखोर गटात माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण, अभिनेता आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा तसेच सायोनी घोष यांची नावे चर्चेत आहेत.

काकोली घोष दस्तिदार यांच्या नेतृत्वाखाली या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. या गटाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवत स्वतंत्र गटाला मान्यता देण्याची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसकडे सध्या 28 खासदार आहेत. त्यामुळे वेगळा गट मान्य होण्यासाठी दोन-तृतीयांश खासदारांची आवश्यकता असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

दरम्यान, ममता बॅनर्जी गटातील कल्याण बॅनर्जी आणि कीर्ती आझाद यांनी बंडखोरांकडे 19 खासदार नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बंडखोरी करणाऱ्यांच्या नावाची यादी

  1. शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल)
  2. काकोली घोष (बरसात)
  3. जगदीश चंद्र बसुनिया (कूच बिहार)
  4. खली उर रहमान (जंगीपुर)
  5. यूसुफ पठान (बहरामपुर)
  6. अबू ताहिर खान (मुर्शिदाबाद)
  7. पार्थ भौमिक (बैरकपुर)
  8. बापी हलधर (मथुरापुर)
  9. सायोनी घोष (जादवपुर)
  10. माला रॉय (कोलकाता साउथ)
  11. मिताली बाग (आरामबाग)
  12. दीपक अधिकारी (घाटल)
  13. कालीपद सोरेन (झालग्राम)
  14. जून मालिया (मेदिनीपुर)
  15. अरूप चक्रवर्ती (बांकुरा)
  16. शर्मिला सरकार (वर्धमान ईस्ट)
  17. असित कुमार मल्ल (बोलपुर)
  18. शताब्दी रॉय (बीरभूम)
  19. रचना बनर्जी (हुगली)

Published on: Jun 10, 2026 06:31 PM

Follow Us
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार