Manoj Jarange Patil : गोळ्या घातल्या तरी हटणार नाही, जरांगेंचा निर्धार कायम, भर पत्रकार परिषदेतून एल्गार
जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले. ताफा अर्ध्या वाटेवर येण्याआधीच मुंबई पोलिसांकडून आजाद मैदानावर आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी मिळाली आहे. मात्र एक दिवस नाही तर बेमुदत उपोषणावर जरांगे पाटील ठाम आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यात तीव्र राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी निघाले आहेत. जालन्यातील अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठ्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने कूच करू लागला आहे. दरम्यान, बुधवारी मुंबई हायकोर्टासह मुंबई पोलिसांनी सुरुवातीला मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर एका दिवसाची परवानगी मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली. असे असले तरी मनोज जरांगे पाटील आक्रमक असल्याचे पाहायला मिळतंय.
मनोज जरांगे पाटील यांनी एक दिवसाची परवानगी मान्य केली मात्र मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या तरच… असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांचा आहे. मात्र मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण करण्यास मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत. आता गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त करत भर पत्रकार परिषदेतून त्यांनी पुन्हा एकदा एल्गार व्यक्त केला.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

