चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, इकडे नका तोंड खुपसू…
आरक्षणासंदर्भात सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे, शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील, त्या बैठकीला मनोज जरांगे पाटील यांनी देखील उपस्थित रहावं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. यावर काय म्हणाले जरांगे ?
मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही नाही तर सरकार भूमिका बदलत असतं, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिल आहे. तर एकनाथ शिंदे सरकार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः उपस्थित राहावं. कारण प्रतिनिधींना आरक्षणासंदर्भातील एखादी गोष्ट मान्य असते तर ती मनोज जरांगे पाटील यांना मान्य नसते, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. आरक्षणासंदर्भात सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे, शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील, त्या बैठकीला मनोज जरांगे पाटील यांनी देखील उपस्थित रहावं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय तर यावेळी त्यांनी भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

