मनोज जरांगे पाटील मराठवाड्यानंतर उद्यापासून पश्चिम महाराष्ट्रात, कसा असेल दौरा?
उद्यापासून म्हणजेच ७ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहे. या दौऱ्या दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली देखील होणार आहे. आज मनोज जरांगे पाटील तुळजापूर येथे मुक्कामी असणार आहेत. मराठवाड्यात दौरा केला नंतर आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे, या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील अद्याप ठाम आहे. अशातच उद्यापासून म्हणजेच ७ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहे. या दौऱ्या दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली देखील होणार आहे. आज मनोज जरांगे पाटील तुळजापूर येथे मुक्कामी असणार आहेत. मराठवाड्यात दौरा केला नंतर आता मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. ६ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे तुळजापूर येथे मुक्कामी, नंतर ७ ऑगस्ट सोलापूर, ८ ऑगस्ट सांगली, ९ ऑगस्ट कोल्हापूर, १० ऑगस्ट सातारा, ११ ऑगस्ट पुणे, १२ ऑगस्ट अहमदनगर, १३ ऑगस्ट नाशिक येथे मनोज जरांगे पाटलांचा दौरा असणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मराठा समाज तयारीला लागला आहे.
Latest Videos
Latest News