AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Fire | कल्याण-शीळफाट्यावर भीषण आग! टायर गोदाम जळतंय, धुराने काळवंडलं आकाश

Kalyan Fire | कल्याण-शीळफाट्यावर भीषण आग! टायर गोदाम जळतंय, धुराने काळवंडलं आकाश

| Updated on: Jun 09, 2026 | 2:55 PM
Share

कल्याण-शीळफाटा मार्गावरील एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीची तीव्रता मोठी असल्याने दूरवरूनही धुराचे प्रचंड लोट आकाशात पसरलेले दिसत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कल्याण-शीळफाटा मार्गावरील एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीची तीव्रता मोठी असल्याने दूरवरूनही धुराचे प्रचंड लोट आकाशात पसरलेले दिसत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कल्याण-शीळफाटा रोडवरील टायर गोदामात अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याबाबत तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मात्र, टायर गोदाम असल्यामुळे आग वेगाने पसरत असून, अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अद्याप आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणात काळा धूर परिसरात पसरला असून, नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली असून, परिसरातील वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळत आहे. आगीमुळे कल्याण-शीळफाटा मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून, परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.

Published on: Jun 09, 2026 02:55 PM

Follow Us