AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे पायलट व्हिडीओ कॉलवर अन् झालं होत्याचं नव्हतं, CCTV फुटेज आलं समोर; बघा व्हिडीओ

रेल्वे पायलट व्हिडीओ कॉलवर अन् झालं होत्याचं नव्हतं, CCTV फुटेज आलं समोर; बघा व्हिडीओ

| Updated on: Sep 29, 2023 | 10:56 AM
Share

VIDEO | उत्तरप्रदेशातील मथुरा येथे मंगळवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताचं CCTV फुटेज समोर आलं असून हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मद्यधुंद रेल्वे पायलटच्या एका चुकीनं लोकल रेल्वे बफर डेड एण्ड तोडून थेट फलाटावर घुसली. या प्रकरणात मद्यधुंद पायलटसह पाच जणं सस्पेंड

उत्तरप्रदेश, २९ सप्टेंबर २०२३ | मथुरा रेल्वे स्थानकावर मंगळवारी एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास फलाट क्रमांक दोनवर उभी असणारी दिल्ली-मथुरा इएमयू प्रवासी ट्रेन अचानक प्लॅटफॉर्मचं शेवटचं टोक म्हणजेच बफर डेड एण्ड तोडून थेट प्लॅटफॉर्मवर चढली. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. पायलट केबिनमधल्या सीसीटीव्ही फूटेजमधून अपघात घडला तेव्हा नेमकं पायलट केबिनमध्ये काय घडलं, याचं सत्य समोर आलं आहे. हे सीसीटीव्ही फूटेज सध्या व्हायरल होत असून त्यानंतर रेल्वे विभागानं पाच कर्मचाऱ्यांना याप्रकरणात निलंबित केलं आहे. मथुरा जंक्शन येथे ट्रेन क्रमांक 04446 शकुबस्ती मथुरा लोकल मथुरा जंक्शनवर मंगळवारी रात्री 10.50 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 2 A वर आली. त्यानंतर पाच मिनिटांत ही लोकल अचानक सुरु होऊन बफर एण्डला धडकल्याचे पाहायला मिळाले. या घटनेत सुदैवाने कोणाला काहीही झाले नाही. परंतू रेल्वेने या प्रकरणाची संयुक्ती चौकशी केली असता लोकल ड्रायव्हर केबिनचा व्हिडीओ समोर आला आहे.

Published on: Sep 29, 2023 10:56 AM