राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! पुन्हा काय घडतंय? राजकीय चर्चांना उधाण
महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात लढल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कल्याण-डोंबिवलीतील मनसे नगरसेवकांच्या शिंदे गटाला पाठिंब्यासह, मुंबईतील स्वीकृत नगरसेवकांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यातील संभाव्य समीकरणांवर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
महापालिका निवडणुका होऊन एक महिना उलटला असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे शिंदे गट आणि भाजपवर टीका केली होती, मात्र निकालानंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेच्या सात नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीत कल्याण-डोंबिवलीतील स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, मुंबईतील स्वीकृत नगरसेवकांबाबतही विचारविनिमय झाल्याचे सांगितले जाते. अचानक झालेल्या या भेटीमुळे भविष्यात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही नवीन राजकीय समीकरणे जुळतात का, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. या भेटीचा नेमका उद्देश काय होता, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने...
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य

