राणेंबरोबर हाणामाऱ्या, जनआशीर्वाद यात्रा सगळं चालतं मग दहीहंडीच का नाही? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

महाराष्ट्र, मुंबईतच निर्बंध का? बाहेरच्या राज्यात का नाही? जन आशिर्वाद यात्रा चालली, तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही, सण आला की लॉकडाऊन का? सणांमधून रोगराई पसरते, यात्रेंमधून, हाणामाऱ्यांमधून नाही का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Aug 31, 2021 | 12:26 PM

सर्व काही सुरु आहे, नारायण राणेंच्याबाबतीत झालं, हाणामाऱ्या झाल्या, भास्कर जाधवांच्या मुलाने अभिषेक केला मंदिरात, यांच्यासाठी सगळं सुरु, फुटबॉल, क्रिकेट सुरु आहे, आम्ही दहीहंडी करायची नाही का? पूर्वीच्या महापौर बंगल्यावर बाळासाहेबांच्या नावावर हडप केलेल्या जमिनीवर बिल्डरांच्या गाड्या कमी झालेल्या नाहीत. फक्त या सणांवर तुम्ही निर्बंध का आणता? मी मनसैनिकांना सांगितलं होतं जोरात दहीहंडी साजरी करा, जे होईल ते होईल, अशी भूमिका राज ठाकरेंनी माडंली.

महाराष्ट्र, मुंबईतच निर्बंध का? बाहेरच्या राज्यात का नाही? जन आशिर्वाद यात्रा चालली, तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही, सण आला की लॉकडाऊन का? सणांमधून रोगराई पसरते, यात्रेंमधून, हाणामाऱ्यांमधून नाही का? यांना जेव्हढं हवं आहे, तेव्हढं करायचं आणि लोकांना घाबरवून ठेवायचं. अस्वलाच्या अंगावर केस किती तसं आम्ही आमच्यावरील केस मोजत नाही. हे सर्व सूडबुद्धीने सुरु आहे. हे विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. आजचा दिवस होऊदे, आम्ही बैठक घेऊन मंदिराची भूमिका घेऊ, मंदिराबाहेर घंटानाद करु. नियम सर्वांसाठी एक लावा, वेगवेगळे नको, असं राज ठाकरे म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें