Gunratna Sadavarte हा वेडा, मनसे नेत्यानं थेट म्हटलं…, काय केली टीका?
VIDEO | टोलच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या टोल जाळण्याच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. यानंतर मनसे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक
ठाणे, ११ ऑक्टोबर २०२३ | टोलच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी इशारा दिला की, जर लहान वाहनांकडून टोल आकारला तर सर्व टोल नाका जाळून टाकू असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केल्यामुळे गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सदावर्ते यांच्या मागणीवर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत अशल्याचा दावा देखील सदावर्ते यांनी केला. मात्र कुणाला घाबरत नसल्याचं प्रत्युत्तर त्यांनी दिलं. दरम्यान, मनसे नते अविनाश जाधव यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सदावर्ते हा वेडा माणूस आहे. त्याला उत्तर देणं हे मला योग्य वाटत नाही, असे थेट म्हणत अविनाश जाधव यांनी टीका केली आहे.
Published on: Oct 11, 2023 12:22 PM
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
