Nagpur MNS Protest | मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार, नेमकं काय घडलं?
नागपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी दिल्या जाणाऱ्या निधीतील कपातीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषद कार्यालयासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनामुळे परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले.

विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी यापूर्वी 300 रुपयांचा निधी दिला जात होता. मात्र, आता तो कमी करून 240 रुपये करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी 240 रुपयांत जितके कपडे येतील तितकेच कपडे परिधान केले होते. तसेच मनसेचा दुपट्टा घालून आणि हातात भांडे घेऊन भीक मागण्याचे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे जिल्हाप्रमुख आदित्य दुरुगकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
“240 रुपयांत विद्यार्थ्यांचा पूर्ण गणवेश खरेदी करणे शक्य नाही. सरकारने गरीब विद्यार्थ्यांची थट्टा थांबवावी,” अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच, “भीक मागून पैसे जमा करून ते शिक्षण मंत्र्यांना पाठवू,” अशा घोषणाही आंदोलनादरम्यान देण्यात आल्या. दरम्यान, या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठीच्या निधीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, याबाबत सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 09, 2026 01:43 PM
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...