Moshi Building Collapsed | मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे 8 जुलै रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे. कचऱ्याचा प्रचंड डोंगर कोसळल्याने वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची प्रशासकीय इमारत जमीनदोस्त झाली होती. या दुर्घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या बचाव आणि शोध मोहिमेनंतर ढिगाऱ्याखालून ९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या दुर्घटनेत 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात बचाव पथकांना यश आले. घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे मोठ्या प्रमाणावर बचावकार्य हाती घेतले होते.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी सलग 83 तास शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर सर्व संभाव्य ठिकाणांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने ही शोधमोहीम अधिकृतपणे थांबवली आहे.
दरम्यान, या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, दुर्घटनेचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
Published on: Jul 12, 2026 02:37 PM
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...