‘उपसा सिंचन’च्या कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागाच नाही, खुर्चीसाठी संघर्ष
सांगोला तालुक्यात बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही योजना मंजूर करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात आज आजी-माजी खासदारांचा खुर्चीसाठी संघर्ष पहायला मिळाला. माढ्याचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना बसायला खुर्चीच मिळाली नाही. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील हे चौघे व्यासपीठावर स्थानापन्न झाल्याने विद्यमान खासदारांना खुर्ची मिळाली नसल्याचे दिसून आले. तर विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे या दोघांनाही कार्यक्रमादरम्यान उभे राहावे लागले. मात्र खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार दीपक साळूंखे उभे असल्याचे लक्षात आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्ती करत खुर्ची उपलब्ध करून दिली. दरम्यान या उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आजी-माजींचे मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. सांगोला तालुक्यात बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बाबासाहेब भोसले आदी नेते उपस्थित होते.

ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला

'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
