Sanjay Raut : हे लोकं फालतू… ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी शेवटी बसवलं? ‘त्या’ फोटोवरून टीका करणाऱ्यांना राऊतांनी फटकारलं
उद्धव ठाकरे यांचे आणखी फोटो आहेत ते पाहिले नाहीत का," असा सवाल संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीतील ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून टीका करणाऱ्यांना केला.
बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सहकुटुंब भेट घेतल्याचे पाहायला मिलाले. राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची राहुल गांधी यांच्या घरी एक बैठक पार पडली. यावेळी देखील राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यावर प्रेझेंटेशन दिलं. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत मागे बसल्याचे एका फोटोमधून दिसून आले. या फोटोवरून ठाकरेंनी दिल्लीत महाराष्ट्राची लाज काढली अशा शब्दात शिंदे गटाने टीका केली. तर या टीकेवर राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन सुरू होतं. उद्धव ठाकरे यांना पुढे बसवण्यात आलं होतं. स्क्रीन समोर बसून पाहताना त्रास होत असल्याने आम्ही सगळेच पाठीमागे गेलो. ती बसायची जागा नव्हती. तिथे प्रेझेंटेशन सुरू होतं. भाजपचे जे फालतू आणि भंपक लोक आहेत, असं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत

