AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ध्यानसे देखो और समझो... संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा, काय केलं नवं ट्वीट?

ध्यानसे देखो और समझो… संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा, काय केलं नवं ट्वीट?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Nov 26, 2023 | 2:58 PM
Share

संजय राऊत यांनी मकाऊतील एका कॅसिनोचा फोटो ट्वीट करून बावनकुळेंवर गंभीर आरोप केले आणि पिक्चर अभी बाकी है, असा इशाराही त्यांनी बावनकुळेंना दिला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकं कोणता व्हिडीओ केला शेअर

मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करणारे ट्वीट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे केल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी सर्वात आधी मकाऊतील एका कॅसिनोचा फोटो ट्वीट केला आणि गंभीर आरोप केले होते. त्यांनतर त्याच मकाऊतील लहानसा व्हिडीओही ट्वीट केला होता आणि पिक्चर अभी बाकी है, असा इशाराही त्यांनी बावनकुळेंना दिला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी cट्वीटरच्या माध्यमातून निशाणा लगावताना एक नवा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी ध्यानसे देखो और समझो.. NO confusion… असं कॅप्शन देखील दिलं आहे. तर स्वामीजी का इशारा किसके तरफ हैं? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Nov 26, 2023 02:58 PM
Follow Us