TET Exam | शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी होणार, राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

आतापर्यंत मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील 601 प्रमाणपत्रांची पडताळणी पुर्ण झालीये, आणि त्यामध्ये 6 प्रमाणपत्र बोगस आढळून आलीत. 2018 सालीही प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या उपाध्यक्षा शैलजा दराडे यांनी शिक्षण विभागाला टीईटीच्या बोगस प्रमाणपत्राचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील 601 प्रमाणपत्रांची पडताळणी पुर्ण झालीये, आणि त्यामध्ये 6 प्रमाणपत्र बोगस आढळून आलीत. 2018 सालीही प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली होती.आता परत एकदा प्रमाणपत्र तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्यानं सगळ्यांचेच धाबे दणाणले असल्याची माहिती आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 201 शिक्षकांनी टीईटी प्रमाणपत्र जमा केली आहेत.  बोगस प्रमाणपत्र असल्यास कारवाई होणार असल्याची माहिती आहे.  शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यानंतर 2013 पासून लागलेल्या शिक्षकांच्या टीईटी प्रामाणपत्राची पडताळणी होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI