AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MSRTC Bus Accident : धाराशिवच्या परंड्यात एसटीचा भीषण अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली अन्...

MSRTC Bus Accident : धाराशिवच्या परंड्यात एसटीचा भीषण अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली अन्…

| Updated on: Jan 27, 2025 | 2:25 PM
Share

परंडा आगाराची बस रोहकल येथे मुक्कामी असलेली बस सकाळी ७ वाजता परंड्याकडे येत असताना सोनारी जवळ रोड लगदच्या झाडाला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे

धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. परंडा तालुक्यातील सोनारी हरणवडा पुलाजवळ एसटीचा हा भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये अनेक विद्यार्थी प्रवास करत होते जे जखमी झाले आहेत. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याचं वय हे ५९ असून तो व्यक्ती करमाळा येथील रहिवासी होता. यासह बस चालकही गंभीर जखमी झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला असं सांगितलं जात आहे. चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव एसटी बसची झाडाला धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला. रोहकलकडून परंड्याकडे ही एसटी बस जात असताना हा अपघात झाला आहे. ही बस परंडा आगाराची असून झालेल्या भीषण अपघातामध्ये अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. रोहकल कंडारी सोनारी मार्गे धावणाऱ्या या बसमध्ये प्रवासी आणि शाळकरी विद्यार्थी परंडाकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातस्थळी अनेकांनी धाव घेऊन जखमी प्रवाश्यांना बाहेर काढून उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण समज शकले नाही , जखमी ना उपचारासाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Published on: Jan 27, 2025 02:25 PM