AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तुकाराम मुंढेंच्या FDA ला मोठा दणका, तब्बल 5 लाखांचं... कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने मोठी खळबळ

मोठी बातमी! तुकाराम मुंढेंच्या FDA ला मोठा दणका, तब्बल 5 लाखांचं… कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयाने मोठी खळबळ

| Updated on: Aug 18, 2026 | 1:39 PM
Share

मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला (FDA) कारवाईचा अतिरेक केल्याबद्दल पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्तींनी पुण्यातील गुरुनानक डेअरी अँड स्वीट्स या दुकानावरील कारवाईवरून एफडीएला चांगलेच धारेवर धरले.

मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला (FDA) कारवाईचा अतिरेक केल्याबद्दल पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्तींनी पुण्यातील गुरुनानक डेअरी अँड स्वीट्स या दुकानावरील कारवाईवरून एफडीएला चांगलेच धारेवर धरले. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने पुण्यातील वडगाव शेरी येथील गुरुनानक डेअरी अँड स्वीट्स या दुकानावर जून महिन्यात कारवाई केली होती.

स्वच्छतेची पूर्तता न केल्यामुळे दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला होता. दुकानाच्या मालकाने तातडीने स्वच्छतेची सर्व पूर्तता केली आणि आपला परवाना पूर्ववत करण्याची मागणी एफडीएकडे केली. मात्र, प्रशासनाने वारंवार मागणी करूनही परवाना पूर्ववत केला नाही, ज्यामुळे दुकान मालकाला मोठा आर्थिक फटका बसला. अखेरीस, या दुकान मालकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने एफडीएच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वच्छतेची पूर्तता केल्यानंतरही परवाना न दिल्याने ही कारवाई अतिरेकी ठरते, असे कोर्टाने म्हटले. न्यायालयाने एफडीएला पाच लाखांचा दंड ठोठावला असून, दुकान बंद राहिल्यामुळे झालेले नुकसान भरपाई म्हणून दुकान मालकाला द्यावे, असेही निर्देश दिले आहेत.

Published on: Aug 18, 2026 01:39 PM

Follow Us