MSRTC Strike: एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ, निवृत्ती वेतन कोविड भत्ता देण्याचे आदेश
मुख्य न्यायामूर्तींनी सांगितलं सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी डायरेक्शन कसे देता येईल एसटी कर्मचाऱ्यांना कोविडचा भत्ता एका कर्मचाऱ्याला 300 रुपये म्हणेज 30 हजार रुपये देण्याचे कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना (msrtc) येत्या 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाने (court) दिले आहेत. मात्र, हे आदेश देतानाच कोर्टाने राज्य सरकारला कानपिचक्याही दिल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ आणि निवृत्ती वेतन देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या आम्ही अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे आता कामगारांनी किंतु, परंतु करू नये. संप करू नये असं राज्य सरकारने कोर्टात सांगितलं. त्याला आम्ही जोरदार आक्षेप घेतला. आम्ही संप करणार नाही. पण एकही आत्महत्या होणार नाही. एकही विधवा होणार नाही याची जबाबदारी घेण्यास सरकारला सांगा, असं आम्ही कोर्टाला सांगितलं, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांनी सांगितलं. मुख्य न्यायामूर्तींनी सांगितलं सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी डायरेक्शन कसे देता येईल एसटी कर्मचाऱ्यांना कोविडचा भत्ता एका कर्मचाऱ्याला 300 रुपये म्हणेज 30 हजार रुपये देण्याचे कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.
Published on: Apr 07, 2022 12:22 PM
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
