धक्कादायक… मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची10 व्या मजल्यावरुन उडी, आत्महत्येचं कारण काय?
आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या २७ वर्षीय विकास रस्तोगी यांच्या मुलीने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. मात्र आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला? आत्महत्या का केली?
मुंबईतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या २७ वर्षीय विकास रस्तोगी यांच्या मुलीने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. मात्र आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला? आत्महत्या का केली? याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने जीवन संपवून घेतल्याने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री 3 च्या सुमारास ही घटना घडली. मुंबई मंत्रालयासमोर सुनीती ही शासकीय इमारत आहे. तिथे 10 व्या मजल्यावर विकास रस्तोगी राहतात. याच इमारतीतील 10 व्या मजल्यावरून त्यांच्या मुलीने उडी मारल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर आहेत. लिपी रस्तोगी असं आत्महत्या करणाऱ्या मुलीच नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Published on: Jun 03, 2024 01:42 PM
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
