Mumbai Local Train : मराठी लोकं लुख्खे, आमच्या घरात… लोकलमध्ये गुजराती व्यक्ती बरळला; बघा व्हायरल VIDEO
घाटकोपरसारख्या काही भागांमध्ये मराठी कुटुंबांना त्रास दिल्याचा आरोप होता. काही घटनांमध्ये मराठी कुटुंबांना मांसाहारामुळे अपमानित करण्यात आलं तर काही ठिकाणी कुत्रा पाळल्यावरून वाद पाहायला मिळाला होता. आता हा वाद लोकलमध्येही दिसतोय.
मराठी आणि हिंदी या भाषेचा वाद सर्वत्र होताना पाहिला मिळत असताना आता गुजराती आणि मराठी वाद पाहायला मिळालाय. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये हिंदी आणि मराठी भाषेवरून वाद होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत असताना गुजराती अन् मराठी वादाचा व्हिडीओ समोर आलाय. मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये गुजराती आणि मराठी भाषेवरून वाद झाल्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मराठी भाषेसह मराठी व्यक्तीचा देखील अपमान करण्यात आल्याच पाहायला मिळतंय. मराठी लोकं आमच्या घरात भांडी घासतात असं वक्तव्य गुजराती व्यक्तीकडून करण्यात आलंय. संतापाच्या भरात गुजराती व्यक्तीने हे वक्तव्य केलंय.
गुजराती व्यक्तीने केलेल्या संतापजनक वक्तव्यानंतर नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर मराठी लोकं लुख्खे असल्याचे म्हणत त्या गुजराती व्यक्तीने मराठी व्यक्तीचा अपमान केला आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक मराठी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. यामुळे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी भाषकांचा अपमान होत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. बघा व्हायरल होणारा व्हिडीओ…
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

