Mumbai Mega Block Update : मुंबईकरांनो…रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक, ‘या’ वेळात प्रवास कराल तर होणार गैरसोय
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. दरम्यान, रेल्वेच्या काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे.
मुंबईकरांनो तुमच्यासाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर उद्या मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेननं प्रवास करणार असाल तर हा व्हिडीओ नक्की तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण अभियांत्रिकी कामासाठी उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान, रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने धावणार आहे. उद्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासोबतच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या आपल्या कामाचे नियोजन या ब्लॉकच्या वेळा बघूनच घरा बाहेर पडा म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

