मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
मुंबईतील पायधुनी परिसरात सात वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी इमारतीतील 32 वर्षीय वॉचमनला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने इमारतीतील बाथरूममध्ये चिमुकलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी नागरिकांनी पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. काही काळ नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून सर्व पुरावे आणि संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. अल्पवयीन पीडितेशी संबंधित असल्याने तिची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.
Published on: Jul 13, 2026 09:55 AM
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका