अखेर ३० तासांच्या मतमोजणीनंतर अमरावतीत मविआचे धीरज लिंगाडे विजयी; भाजपला मोठा धक्का

हर्षदा शिनकर, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 03, 2023 | 2:33 PM

अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत धीरज लिंगाडे हे एकूण 46 हजार 330 मतं मिळवून विजयी

अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या रणजीत पाटील यांचा पराभव करत मविआचे धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. गेल्या ३० तासांपासून अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतची मतमोजणी सुरू होती, अखेर या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निकालाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. मात्र हा निकाल भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात सुरूवातीपासून धीरज लिंगाडे आघाडीवर होते. मात्र, संध्याकाळी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी अवैध बाद मतांवर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यानंतर ही फेरमतमोजणी सुरू झाली होती. तब्बल 30 तास ही फेर मतमोजणी झाली. त्यात लिंगाडे हे विजयी झाले. त्यांनी मोठ्या फरकाने रणजित पाटील यांना पराभूत केले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI