Indrajit Sawant Threat Update : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरने दिली धमकी?
नागपुरातील प्रशांत कोरटकर याने इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचे समोर आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकरच्या मोबाईल सीडीआरवरून इंद्रजीत सावंत यांना त्यानेच धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकऱणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नागपुरातील प्रशांत कोरटकर याने इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचे समोर आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकरच्या मोबाईल सीडीआरवरून इंद्रजीत सावंत यांना त्यानेच धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीकडून इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. इंद्रजीत सावंत यांनी स्वतः हा आरोप केला होता. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी प्रशांत कोरटकर याचा सीडीआर काढणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी ही नागपुरातूनच देण्यात आल्याचे समोर येत आहे. इतकंच नाहीतर ही धमकी प्रशांत कोरटकर याच्या नंबरवरून गेली होती, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणात आवाज मार्फ केल्याचा दावा करत प्रशांत कोरटकर याने करत आरोप फेटाळून लावले होते. मात्र तो दावा खोटा असल्याचे दिसून येत आहे. प्रशांत कोरटकर याच्या तपासासाठी आता नागपूर पोलीस, कोल्हापूर पोलीस पथकं शोध घेत आहेत. प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरनंतर आता नागपुरातही गुन्हा दाखल झाला आहे.
Published on: Mar 01, 2025 11:45 AM
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
