Indrajit Sawant Threat : ‘तुम्ही थोड्याच दिवसांचे सोबती, घरी येऊन…’, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना पुन्हा धमकी
ऑडिओ क्लिपचं प्रकरण ताजं असताना इंद्रजीत सावंत यांना पुन्हा धमकी देण्यात आली आहे. 'तुम्ही थोड्याच दिवसांचे सोबती तुम्हाला घरी येऊन मारू', सोशल मीडियावर अशी धमकी इंद्रजीत सावंत यांना देण्यात आली.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना पुन्हा एकदा धमकी मिळाल्याची बातमी समोर येत आहे. ऑडिओ क्लिपचं प्रकरण ताजं असताना इंद्रजीत सावंत यांना पुन्हा धमकी देण्यात आली आहे. ‘तुम्ही थोड्याच दिवसांचे सोबती तुम्हाला घरी येऊन मारू’, सोशल मीडियावर अशी धमकी इंद्रजीत सावंत यांना देण्यात आली. सोशल मीडियावर केशव वैद्य नावाच्या अकाऊंटवरून इंद्रजीत सावंत यांना अशी धमकी देण्यात आली आहे. यावर बोलताना इंद्रजीत सावंत म्हणाले, अशा धमक्या सोशल मीडियावर येत असतात मी त्याची दखल घेत नाही. दरम्यान, ‘मला मिळालेल्या धमकीवर मी कोणत्याही प्रकारची तक्रार देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला त्याबद्दल आपण बोलणं गरजेचं आहे.’, असं इंद्रजीत सावंत त्यांना आलेल्या धमकी नंतर म्हणाले. तर गेल्या चार दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीकडून इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. इंद्रजीत सावंत यांनी स्वतः हा आरोप केला आहे. धमकी देण्यात आल्याचं संभाषण इंद्रजीत सावंत यांच्याकडून सोशल मीडियाकडून शेअर करण्यात आलं आहे. मात्र आता इंद्रजीत सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकर या व्यक्तीकडून फेटाळण्यात आले होते.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

