Narayan Rane | अर्थमंत्री आले, पराभव करुन गेले, याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा अजितदादांना टोला
अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.
सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी सिंधुदुर्गमध्ये गेल्यावर संस्था वाढवायला अक्कल लागते, डोकं लागतं, बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी कोपरखिळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावली होती, मात्र जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर नारायण राणेंनी अजित पवारांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. यावेळी नाणेंना आता पुढचं टार्गेट हे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असेल, महाराष्ट्रातील सत्ता असेल असेही सांगितले आहे.
अर्थमंत्री येऊन पराभव करून जातात
ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरत होते, नितेश राणेंचं बेल अॅप्लिकेशन चार चार दिवस चालतात. माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.
Follow Us
Latest Videos
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट

