Narayan Rane | पुन्हा घरावर याल, तर याद राखा, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कुडाळमध्ये पोहोचली. यावेळी बोलताना राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा देत पुन्हा घरावर आल्यास याद राखा असं म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज कुडाळमध्ये पोहोचली होती. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना, संजय राऊत अशी टीका केली तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ही इशारा दिला. पुन्हा घरावर याल, तर याद राखा असा इशारा राणेंनी यावेळी दिला.
इतक्या वर्षात माझ्या घरापर्यंत कोणी आलं नव्हतं पण यावेळी असं झालं हे मी कधीही विसरणार नाही असं राणेंनी म्हटलं. तसेच यापुढे माझ्यापर्यंत, मुलापर्यंत कोणी आल्यास याद राखा असंही राणे यावेळी बोलताना म्हणाले. त्यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही तुफान टीका केली.
Latest Videos
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक

