नाशिकमध्ये कोथिंबीरीनं गाठलं शतक, दुसऱ्या भाजीपाल्याची घसरण, शेतकऱ्यांच्या संमिश्र भावना
नाशिक बाजार समितीमध्ये कोथंबीरिला आज चांगला भाव मिळाल्याने शेतकाऱ्यांमध्य समाधानाचं वातावरण आहे. सरासरी 60 रुपये ते 100 रुपये एका जुडीला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.पावसाने नुकसान झाल्यामुळे कोथिंबिरीची आवक घटलीय असल्याचं समोर आलंय.
नाशिक: नाशिक बाजार समितीमध्ये कोथंबीरिला आज चांगला भाव मिळाल्याने शेतकाऱ्यांमध्य समाधानाचं वातावरण आहे. सरासरी 60 रुपये ते 100 रुपये एका जुडीला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.पावसाने नुकसान झाल्यामुळे कोथिंबिरीची आवक घटलीय असल्याचं समोर आलंय.गेल्या पंधरावड्यात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचं नुकसान झालं. गेल्या काही दिवासंपासून कोथिंबीरीची आवक घटल्यानं दर वाढले आहेत. सध्या कोथिंबीरीला चांगला भाव मिळत असला तरी इतर भाजीपाल्याला दर नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे.
कोथिंबीरीला जरी चागंला भाव मिळत असलं तरी इतर भाजीपाल्याला दर नसल्यानं शेतकरी नाराज आहेत. कोबी, टोमॅटोचा दर कमी झालाय, शिमला मिरचीच्या उत्पादनाला मोठा खर्च येतोय. मात्र, 10 रुपये किलोनं शिमला मिरचीची विक्री केली जाते हे फार अडचणीत आणणार असल्याचं आहे, असं शेतकरी म्हणाले आहेत.
Published on: Aug 10, 2021 03:54 PM
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...

