AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक IT प्रकरणात नवा ट्विस्ट! फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाखल करत म्हणाली...

नाशिक IT प्रकरणात नवा ट्विस्ट! फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाखल करत म्हणाली…

| Updated on: Apr 17, 2026 | 4:14 PM
Share

नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.  या प्रकरणातील महिला आरोपी निदा खान गेल्या 21 दिसांवपासून फरार होती. ती आता भिवंडी, मुंब्रा या शहरांमध्ये लपलेली असल्याच समोर येत आहे. इतकेच नाही तर...

नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या संबंधित आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणातील महिला आरोपी निदा खान गेल्या 21 दिसांवपासून फरार होती. ती आता भिवंडी, मुंब्रा या शहरांमध्ये लपलेली असल्याच समोर येत आहे. इतकेच नाही तर या संबंधित आणखी माहिती समोर आली आहे.

नाशिकमधील लैंगिक शोषण, अत्याचार प्रकणात सामिल असलेल्या निदा खानने गर्भवती आहे म्हणून अटक करु नये असा जामीन अर्ज दाखल केला आहे. नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत सर्व प्रकरण उघडकीस आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मिटींगच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत मानसिक छळ आणि आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून असिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन यांना अटक करण्यात आली आहे.

Published on: Apr 17, 2026 04:14 PM
Follow Us