AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | 15 कोटींचा पैशांचा पाऊस पाडतो! भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी, बाकी...

Nashik | 15 कोटींचा पैशांचा पाऊस पाडतो! भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी, बाकी…

| Updated on: Sep 10, 2026 | 3:30 PM
Share

नाशिकमध्ये पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका भोंदू बाबाने मुंबईतील एका कुटुंबाला सुमारे ११ लाख रुपयांना फसवले. हिराचंद बर्डे नावाच्या या भोंदूने पूजाविधीनंतर बनावट नोटांची गोणी दिली होती. पिडितांच्या तक्रारीनंतर अनिसच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

नाशिकमध्ये पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एका कुटुंबाची मोठी फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा हिराचंद बर्डेला अटक करण्यात आली आहे. कळवण तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीने मुंबईतील बोरीवली येथील एका कुटुंबाला १५ कोटी रुपयांच्या पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले होते.

या भोंदू बाबाने रोख आणि ऑनलाइन पद्धतीने सुमारे १० लाख ९५ हजार रुपये उकळले. पूजा विधीनंतर त्याने पैशांनी भरलेली गोणी दिली, मात्र त्यात वरची एक नोट खरी आणि उर्वरित नोटा खेळण्यातील बनावट असल्याचे समोर आले. पैसे परत मागितल्यानंतर पिडितांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पिडितांनी अनिसच्या मदतीने भोंदू बाबाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी हिराचंद बर्डे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे, तर तीन जण फरार आहेत. या भोंदूने आणखी अनेकांना फसवले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Published on: Sep 10, 2026 03:30 PM

Follow Us