अन्यथा 3 मे नंतर थेट कारवाई करुन भोंगे काढणार – Deepak Pandey
सामाजिक सुव्यवस्था व्यवस्थित रहावी. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे आणि मुस्लीम समाजाचे पत्र आले होते. या सर्वांसोबतच मी आयुक्त म्हणून हा निर्णय घेतला, असे आयुक्त दीपक पांडेंनी सांगितले.
नाशिक : सर्व मशिदींवरील भोंगे 3 मे पर्यंत काढले नाहीत तर त्यानंतर थेट कारवाई केली जाईल असे आदेश नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिले आहेत. नियमाचं उल्लंघन केल्यास चार महिने ते एक वर्ष तुरूंगवास होणार आहे. सर्व मशिदींवर भोंग्यांसाठी परवाणगी घेणे बंधनकारक आहे. अजानपूर्वी 15 मिनिटं, 100 मिटरवर हुमान चालीसा लावता येईल. परवानगी न घेतल्यास कारवाई करण्यात येईल. सामाजिक सुव्यवस्था व्यवस्थित रहावी. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे आणि मुस्लीम समाजाचे पत्र आले होते. या सर्वांसोबतच मी आयुक्त म्हणून हा निर्णय घेतला, असे आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले.
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
