AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार

संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार

| Updated on: Aug 13, 2026 | 2:11 PM
Share

५ हजार कोटींमध्ये निवडणूक आयोगाने शिंदेंना पक्ष विकला असं राऊतांनी म्हटलेलं आहे. निवडणूक आयोग पक्ष विकण्याचा एजंट असल्याचंही राऊत म्हणतायत. तर संजय राऊत हेच दलालांचे नेते आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार आहे. निवडणूक आयोगावर टीका करताना राऊत म्हणाले की  पक्ष आणि चिन्ह हेच महत्त्वाचं आहे ना? या पक्षावर, जो पक्ष एका […]

५ हजार कोटींमध्ये निवडणूक आयोगाने शिंदेंना पक्ष विकला असं राऊतांनी म्हटलेलं आहे. निवडणूक आयोग पक्ष विकण्याचा एजंट असल्याचंही राऊत म्हणतायत. तर संजय राऊत हेच दलालांचे नेते आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार आहे. निवडणूक आयोगावर टीका करताना राऊत म्हणाले की  पक्ष आणि चिन्ह हेच महत्त्वाचं आहे ना? या पक्षावर, जो पक्ष एका घटनात्मक रीतीने चालवला गेला, एक घटना तयार करून आणि पक्षामध्ये आमचं सगळ्यांचं बहुमत असताना निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेंना विकला. ५ हजार कोटीला. मी आकडा सांगतो. आता याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत त्याचा हिशोब ते देतील. निवडणूक आयोग हा एजंट आहे या पक्ष विकण्यामध्ये आणि आतापर्यंत निवडणूक आयोगानं असे चार पक्ष विकलेले आहेत. आमचा, त्यानंतर शरद पवार साहेबांचा, आता तृणमूल काँग्रेसचा आणि अजून एक पक्ष मधल्या काळात अशाप्रकारे विकला गेला. ही विक्री निवडणूक आयोग जर करत असेल लोकशाहीची, तर या देशात उरलं काय? मी जो आकडा सांगतोय हा आकडा खरा आहे. कदाचित याच्यापेक्षा जास्त आकडा त्यांचे लोक सांगू शकतील, शिंदेंचे. तर या टीकेला उत्तर देताना बन असं म्हणतात की संजय राऊत जनतेचे विरोधी पक्षनेते नाहीत, तर संजय राऊत दलालांचे नेते आहेत. दलाली करणं, काँग्रेसची गुलामगिरी करणं आणि राहुल गांधी, सोनिया गांधींची दलाली करणं एवढंच संजय राऊतांना जमतंय. त्यामुळे तुम्ही जनतेचे विरोधी पक्ष नाहीयेत. तुम्ही दलालांचे नेते आहेत, दलाली करणाऱ्यांचे नेते आहेत आणि स्वतः दलाली खाणारे नेते आहेत. राज्यसभेची खासदारकी तुम्हाला हवी आहे, म्हणून तुम्ही काँग्रेसची दलाली करतायत. त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षनेते नाहीत, तर दलालांचे नेते आहेत हे महाराष्ट्राने ओळखलेलं आहे.

Published on: Aug 13, 2026 02:11 PM

Follow Us