AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...

OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली… नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट…

| Updated on: Aug 17, 2026 | 10:17 AM
Share

नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात, असे वाघमारे म्हणाले होते. या विधानामुळे माढा आणि नांदेडसह अनेक ठिकाणी मराठा समाजाने तीव्र निषेध नोंदवत वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या तरुणींबद्दल एक संतापजनक विधान केले आहे. ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात, असे वक्तव्य वाघमारे यांनी केले आहे, ज्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यांच्या या धक्कादायक विधानावर मराठा समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वाघमारे यांच्या मते, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठा मुलींनी प्रवेश केला आहे आणि यामुळे जर हे मंत्री ओबीसींचे वाटोळे करत असतील, तर त्यांनी समोर येऊन स्पष्ट करावे की त्यांना ओबीसींशी काही घेणेदेणे नाही. स्वतः बावनकुळे साहेबांनी त्यांची सून मराठा आणि पत्नी कुणबी असल्याचे सांगितले होते, याचा संदर्भ देत वाघमारे यांनी आपले विधान मांडले. या वक्तव्यानंतर सोलापूरच्या माढा आणि नांदेडमध्ये मराठा समाजाने तीव्र आंदोलन केले आहे. माढा येथे वाघमारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला आहे, तर नांदेडमध्ये मराठा महिलांनी वाघमारे शहरात आल्यास तोंडाला काळं फासण्याचा इशारा दिला आहे. सकल मराठा समाजाकडून नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला असून, वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Published on: Aug 17, 2026 10:17 AM

Follow Us