BMC election 2022: बीएमसी निवडणुकीत नवनीत राणा भाजपच्या स्टार प्रचारक
मुंबई, भाजपा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुंबई येथे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी बीएमसी निवडणुकीबाबत (BMC Election 2022) चर्चा झाल्याचे नवनीत राणा यांनी सांगलीतले. बीएमसी निवडणुकीमध्ये पूर्ण ताकत लावणार असून राज्य सभेपेक्षा मोठा विजय अपेक्षित असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी निवडणुकीच्या प्रचाराची धुरा नवनीत राणा यांच्यावर सोपवण्यात येणार […]
मुंबई, भाजपा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुंबई येथे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी बीएमसी निवडणुकीबाबत (BMC Election 2022) चर्चा झाल्याचे नवनीत राणा यांनी सांगलीतले. बीएमसी निवडणुकीमध्ये पूर्ण ताकत लावणार असून राज्य सभेपेक्षा मोठा विजय अपेक्षित असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी निवडणुकीच्या प्रचाराची धुरा नवनीत राणा यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. नवनीत राणा यांच्यासाठीही ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी रवी राणासुद्धा होते. आगामी महानारपालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची असते. राज्यसभेच्या निकालानंतर या निवडणुकीची उत्सुकता आता सर्वांमध्येच आहे. याशिवाय काँग्रेस नेत्यांवर होत असलेल्या कारवाईबद्दल विचारले असता, संविधात्मक मार्गाने कारवाई होत असल्याचे त्या म्हणाल्या.
Published on: Jun 16, 2022 02:56 PM
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..