अजित पवारांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवे अन्...

अजित पवारांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवे अन्…

| Updated on: Nov 02, 2024 | 10:39 AM

गोविंदबागेत शरद पवारांना तर काटेवाडीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. अजित पवार यांना भेटण्यासाठी राज्यातील आणि पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत आहेत.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. त्यानंतर आता दरवर्षीप्रमाणे होणारा पवारा कुटुंबाच्या पाडव्याच्या कार्यक्रमातही फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपला दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. गोविंदबागेत शरद पवारांना तर काटेवाडीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. अजित पवार यांना भेटण्यासाठी राज्यातील आणि पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत आहेत. अजित पवार, अजित पवार त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून संपूर्ण पवार कुटुंब ‘गोविंदबाग’ या शरद पवारांच्या निवासस्थानी पाडवा साजरा करत होतं. यावेळी शरद पवार आणि अजित पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते एकत्र जमायचे. मात्र आता पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे.

Published on: Nov 02, 2024 10:39 AM