Gotya Gitte : तुला महागात पडणार, तू वंजाऱ्यांचा… वॉन्टेड आरोपी गोट्या गित्तेची खुलेआम आव्हाडांना धमकी, पण…
बीडच्या परळीमधील अनेक गुन्ह्यात फरार आरोपी गोट्या गित्तेनं व्हिडिओ बनवून जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली आणि त्यावरून वारंवार व्हिडिओ बनवून पोस्ट करणारा गोट्या गित्ते पोलिसांना कसा सापडत नाही? असा प्रश्न विचारला जातोय.
अनेक गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपी आता व्हिडिओ बनवून धमक्या देऊ लागल्याने पोलीस दलावर टीका होतेय. धक्कादायक म्हणजे संतोष देशमुख हत्तेत वाल्मिक कराड आमचा दैवत असल्याचा दावा करत गोट्या गित्तेनं जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली. गोट्या हा मुळ परळीमधला असून त्याला वाल्मिक कराडचा राईटहँड म्हटलं जातं. चोरी, हाफ मर्डर, दरोडे असे असंख्य गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तो कागदोपत्री फरार असला तरी त्याचा अनेक ठिकाणी खुलेआम वावर असल्याचे बोलले जातोय. मात्र बीड पोलीसांच्या मते तो फरार असून त्याचा ठावठिकाणा आम्हाला माहिती नाही. पण हाच वॉन्टेड आरोपी कराडला बीड कोर्टामध्ये नेले जात असताना पोलिसांच्या गाडीत हजर होता, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.
याआधी फरार वाल्मिक कराड स्वतः आपण सरेंडर होत असल्याचा व्हिडिओ बनवत पोलिसांकडे आला होता. कराडच्या शोधासाठी बिडच्या पोलिसांनी कराडच्याच एका कट्टर समर्थकाला सोबत घेतलं होतं. कराड सरेंडर होणार हे माध्यमांसहित कराडच्या अनेक समर्थकांना माहिती होऊनही पोलीस यापासून अनभिज्ञ होते. जसा संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना मिळालेला नाही. तसा महादेव मुंडे हत्येतही गोट्या गित्तेचा शोध पोलीसांना लागत नाहीये.
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद

