अजितदादांसमोर शरद पवार यांच्यावर निशाणा, मोदी यांच्या ‘त्या’ टीकेवर सुप्रिया सुळे यांचं प्रत्युत्तर
VIDEO | 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शरद पवार यांना कृषी क्षेत्रातील कामासाठी पद्मविभूषण पुरस्कार दिला होता. एका गोष्टीचा मला आनंद आहे की, महाराष्ट्रात मोदी आल्यानंतर त्यांनी शरद पवार यांचं नाव घेतलं', मोदींच्या 'त्या' टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार
मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३ | शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून मोदी यांनी अजित पवार यांच्या समोरच शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार केंद्रात बराच काळ कृषी मंत्री राहिले पण शेतकऱ्यांसाठी काय केलं? अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तर यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेवरून जोरदार पलटवार केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शरद पवार यांना कृषी क्षेत्रातील कामासाठी पद्मविभूषण पुरस्कार दिला होता. एका गोष्टीचा मला आनंद आहे की, महाराष्ट्रात मोदी आल्यानंतर त्यांनी शरद पवार यांचं नाव घेतलं. मोदी नेहमीच शरद पवार यांचं नाव घेतात कधी प्रेमाने तर कधी रागाने’, असे म्हणत त्यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

