तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पत्रकार परिषद, स्पष्ट म्हणाले, NCP मध्ये आता सगळंच…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरून मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारिणीच्या यादीत सुनील तटकरे यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राष्ट्रवादीतील नेत्यांनी या प्रकरणावरून पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी पक्षातील नेते अविनाश अदिक यांनी माध्यमांसमोर निवडणूक आयोगाला दिलेल्या यादीबाबतही सांगितले. ते म्हणाले, “कोणतेही मतभेद असले तरी कार्यालयात कोणत्याही वरिष्ठ नेत्याला बंदी नाही. त्यामुळे राष्ट्रावादीत फूट वगैरे किंवा तक्रार या ऐकीव बातम्या आहेत. पक्षात सगळे स्वतःच्या पदावरच आहेत. त्याच जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. उद्या काय होईल ते काही सांगता येत नाही, मात्र सध्या राष्ट्रवादीत सगळेच ठीक आहे… योग्य आहे.’
Published on: May 16, 2026 05:00 PM
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा