सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत… पुण्यात राष्ट्रवादीचा हायव्होल्टेज ड्रामा
महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि कोकण या जागा मिळाल्या आहेत. कोकणमधून अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र पुण्याच्या जागेवरून पक्षात मोठा वाद पेटला आहे.
महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि कोकण या जागा मिळाल्या आहेत. कोकणमधून अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र पुण्याच्या जागेवरून पक्षात मोठा वाद पेटला आहे.
ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याने पुण्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक नेत्यांना डावलण्यात आल्याची भावना पक्षात निर्माण झाली आहे.
या निर्णयानंतर काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. सुनील टिंगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून रामदास गाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक स्पष्ट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी जिजाई बंगल्यावर पदाधिकाऱ्यांसोबत अनेक तास चर्चा केली. मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध असतानाही विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज नेत्यांची समजूत कशी काढली जाणार आणि याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 01, 2026 02:03 PM
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित!

