‘पोलिसांच्या वाहनातून सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारांना पैसे…’, शरद पवारांचा खळबळजनक आरोप
बारामतीत शरद पवार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसह पोलिसांच्या वाहनातून सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारांना पैसे पोहोचवले जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. बघा नेमंक काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान शरद पवारांनी खळबळजनक आरोप केल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार म्हणाले, ‘अनेक गोष्टी हल्ली होतात. हे सरकारचं वैशिष्ट्ये आहेच. विमानने फॉर्म पोहोचवला. अनेक जिल्ह्यातून ऐकतोय, अधिकाऱ्यांकडून ऐकतोय, सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना अर्थ सहाय्य दिलं जातं त्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात. पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पोहोचवली जाते. त्या विभागातील अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळतं’. पुढे ते असेही म्हणाले, पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पोहोचवली जाते. त्यावर मला त्यावर अधिक बोलायची इच्छा होती. पण त्या अधिकाऱ्यांनी कमिटमेंट करून घेतली आमची नाव पुढे आणू नका. त्यामुळे त्यांचं भवितव्य संकटात जावू नये म्हणून मी अधिक बोलत नाही. पण ही नावे ऐकायला मिळतंय की पोलीस दलाची वाहनं आहेत त्यातून उमेदवारांना रसद पोहोचवली जात आहे. माझ्या हातात ऑथेटिंक माहिती असती तर मी वाटेल ते केलं असतं. पण माहितीशिवाय भाष्य करणं हा माझा स्वभाव नाही, असंही शरद पवार म्हणाले.
Published on: Nov 02, 2024 05:07 PM
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
